एरंडोल प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर नोकरी लावून देण्याच्या आमिष दाखविणाऱ्या एकाच्या घरावर दोघांनी दगडफेक करून नुकसान केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, वामन सोमा सोनवणे (वय-४६) रा. केंद्र आदर्श नगर एरंडोल यांनी शहरातील रोहन सोनवणे याला नोकरी न लावल्यामुळे याचा राग आल्याने रोहन भगवान सोनवणे आणि अनुसया भगवान सोनवणे दोन्ही रा. जहांगिरपुरा एरंडोल यांनी राष्ट्रीय महामार्गावर येऊन वाईट वामन सोनवणे याच्या घरावर दगडफेक व घरासमोर शिवीगाळ केली. वामन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 मे रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडला. पुढील तपास एरंडोल पोलीस कर्मचारी करीत आहे.