अश्लिल चाळे करत तरूणीचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरूणीसोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या कुटुंबातील सदस्यांना मारण्याची धमकी दिल्याची घटना १४ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १५ मार्च रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १४ मार्च रोजी रात्री ८ वाजता पिडीत तरूणी पायी जात असतांना गावात राहणारा दिपक वना मालचे याने पिडीत तरूणीचा हात पकडला व अश्लिल चाळे करत विनयभंग केला. त्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी पीडीत तरूणी ही दिपकच्या घरी गेली असता त्यावेळी दिपकसह संगिता वना मालचे आणि वना रामा मालेचे या तिघांनी तरूणीला शिवीगाळ केली तर तिच्या घरच्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीत तरूणीने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी दिपक वना मालचे, संगिता वना मालचे आणि वना रामा मालेचे या तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीश पाटील हे करीत आहे.

Protected Content