जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली गावाजवळील बारी शाळेजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने विटनेर गावातील दोघांच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्रसिंग रामसिंग पाटील वय-४१, रा. वडगाव खुर्द तालुका पाचोरा असे चालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील बारी शाळेसमोरील रस्त्यावर भरधाव कार क्रमांक (एमएच ०२, सीबी ५४४१) ने जळगावकडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने कांतीलाल उर्फ कान्हा रमेश राठोड वय २४, आणि रवींद्र किसन चव्हाण वय ३० दोन्ही रा. विटनेर तांडा ता. जळगाव या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमध्ये पोलिसांनी कार जप्त केली आहे दरम्यान या घटनेप्रकरणी शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता कारचालक महेंद्रसिंग रामसिंग पाटील (वय-४१, रा. वडगाव खुर्द ता. पाचोरा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले करीत आहे.