यावल प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. आज लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने केलेल्या कारवाई सहा दुकानदारांनावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीलबंद कारवाई करत दंड वसूल केला असून एका दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या दुकानांवर केली कारवाई
१) एस एम बी मार्ट , (सात हजार रुपये )
२) परी कलेक्शन , (पाच हजार रुपये )
३) अभय देवरे सोनार , ( पाच हजार रूपये )
४) सहारा जनरल स्टोअर्स ( पाच हजार रुपये ) ,
५) बसेरा जनरल स्टोसर्स , ( पाच हजार रुपये )
६) सदगुरु बुक स्टॉल जिनिंग प्रेसिंग शॉपींग कॉम्पलेक्स, या दुकानावर सिल करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज करण्यात आलेल्या या कार्यवाहीत नगर परिषदचे कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी विजय बडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरिक्षक शिवानंद कानडे , मुबिन शेख , संदीप पारधे, रामदास घारू, नितिन पारधे, रवी काटकर यांनी सहभाग घेतला. दरम्यान या कार्यवाहीत पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांनी महत्वाची भुमीका बजावली .