चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर कारमधून आलेल्या ५ जणांनी कट्ट्यातून फायरिंग करत जखमी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली होती. यात बाळू मोरे हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ५ हल्लेखोर आणि कट रचनारे २ असे एकुण ७ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.
चाळीसगाव येथील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बुधवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बसलेले होते. त्यावेळी त्यांचे कार्यालयासमोर एक कार उभी राहिली, त्या कारमधून ५ जण बाहेर पडले त्यांनी तोंडावर रुमाल बांधलेले होते. प्रत्येकाच्या हातात गावठी कट्टा होता. यापैकी ३ जण पुढे आले, तिघांपैकी २ जणांनी गोळ्या झाडल्या या घटनेत माजी नगरसेवक बाळू मोरे हे गंभीर जखमी झाले. त्याच्यानंतर कारमधील इतर २ जण घटनास्थळी आले. दरम्यान गोळीबार झाल्यानंतर पाचही जण कारमध्ये बसून नारायणवाडी पेट्रोल पंपाच्या दिशेने फरार झाले. हा सर्वा घटनाक्रम नजीकच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. या घटनेमुळे चाळीसगाव शहरात मोठी खळबळ उडाली होती, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी गाव घेतली, या परिसरात फायरिंग झाल्यानंतर मोठी दहशत पसरली होती.
जखमी झालेले बाळू मोरे यांना तातडीने चाळीसगाव वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची आता प्रकृती जरी गंभीर असले मात्र त्यांच्यावर फायरिंग करण्याचा का करण्यात आली याची माहिती समोर आलेली नाही. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूडे आदी पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या सात जणांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान बाळू मोरे यांच्या संपर्क कार्यालयात असलेले संजय बैसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उद्देश उर्फ गुड्डू शिंदे, सॅम चव्हाण दोन्ही रा. हिरापूर, सचिन गायकवाड, अनिस शेख उर्फ नवा शरीफ शेख, भूपेश सोनवणे, सुमित भोसले चारही रा. चाळीसगाव आणि संतोष निकुंभ उर्फ संता पैलवान रा. हिरापूर,चाळीसगाव अशा ७ जणांवर संशय व्यक्त करत त्यांच्यावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहे.