जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आर.एल.चौफुली येथे भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार आसीफ कुरेशी हाजी शौकत कुरेशी (वय ४०, रा. सुप्रिम कॉलनी) हे जागीच झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजीत बाळू कोळी (रा. कठोरा, ता. यावल) असे डंपर चालकाचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणारे आसीफ कुरेशी हे वॉलपेपरचे काम करीत होते. बुधवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आसीफ कुरेशी हे त्यांची (एमएच १९, डीसी १७५१) क्रमांकाच्या दुचाकीने सुप्रिम कॉलनीकडून शहराकडे येत होते. त्यावेळी आर.एल.चौफुली येथे मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १९, सीएक्स ४९४०) क्रमांकाच्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात आसीफ कुरेशी हे जागीच ठार झाले होते. याप्रकरणी मयताचे सासरे मोहम्मद नवमुद्दीन कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन डंपर चालक रणजीत बाळू कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहे.