जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इंन्स्टाग्रामवर महापुरूषांच्या फोटोला आक्षेपार्ह कमेंट करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी बुधवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता शिवाजी नगर हुडको येथे राहणाऱ्या एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी नगर हुडको परिसरात प्रशिक दिपक ससाने हा तरूण वास्तव्याला आहे. मंगळवारी १ ऑगस्ट रोजी तो त्यांच्या मोबाईलमध्ये इंन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असतांना एका अकाऊंटवर एक महापुरूषांबद्दलचा व्हिडीओ शेअर झालेला दिसला. या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये एका इंस्टाग्राम आयडीवरून तीन दिवसांपुर्वी महापुरूषांबद्दल अश्लिल व आक्षेपार्ह कमेंट केल्याचे दिसून आले. प्रशिक ससाने याने लागलीत समाज बांधवांना सांगितले. अश्लिल भाषा केल्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होवून जातीय दंगल घडविण्याच्या हेतूनेच ही कमेंट केल्याचे लक्षात आल्याने समाज बांधवांनी बुधवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी तपास केल्यानंतर कमेंट करणारा संबंधित व्यक्ती शिवाजी नगर हुडको येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार प्रशिक ससाने याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार करीत आहे.