जिल्हा परिषदेत कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान

जळगाव, प्रतिनिधी  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन म्हणून राज्य शासन व  जिल्हा परिषद कृषी विभाग,आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शाहू महाराज  सभागृहात जि. प. अध्यक्षा ना. रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.  

 

कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास  प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्जवला म्हाळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर,जळगाव पं.स.उपसभापती संगिता चिंचोरे, जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन यांच्यासह जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी आणि कृषी विभागातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांसह मान्यवरांच्याहस्ते कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर आदर्श शेतकरी व राज्यस्तरीय पीक स्पर्धा पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला.कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डा.संजीव पाटील व हेमंत बाहेती यांनी पीक लागवडीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, आत्माचे उपसंचालक मधुकर चौधरी, उपसंचालक कुर्बान तडवी, कृषी अधिकारी शितल पाटील, प्रतीक्षा सोनवणे,धीरज बढे, प्रिती अहिरे,आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार कृषी अधिकारी प्रकाश महाजन यांनी मानले.

 

Protected Content