जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गायत्री नगरात घरासमोर उभे असलेले मालवाहू वाहनाने अचानक पेट घेतल्याने वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, महेश मुरलीधर मंधान (५८, रा. गायत्रीनगर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी वाहन चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. महेश मंधान यांच्याकडे असलेले मालवाहू वाहन (क्र. एमएच १९, बीएम २९३७) त्यांनी १६ नोव्हेंबर रोजी घरासमोर उभे केले होते. त्या वेळी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरासमोर उभे असलेल्या वाहनाने अचानक पेट घेतला. मालकाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत वाहन जळून खाक झाले. या प्रकरणी मंधान यांनी शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहेत.