व्यापाऱ्याच्या घरासमोरून कार लांबविली; आठवडाभरातील दुसरी घटना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात राहणार्‍या एका व्यापाऱ्याची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात बुधवार १२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रविंद्र हरी पाटील (वय-५३) रा. शिव कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ६ जुलै रोजी रात्री १२.३० वाजता त्यांची कार क्रमांक (एमएच १९ एपी ३८६०) ही घराच्या कंपाऊंडच्या बाहेर पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हे कार चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी ७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले. त्यानंतर रवींद्र पाटील यांनी कारचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांना कार कुठेही मिळाली नाही अखेर बुधवारी १२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता त्यांनी रामानंद पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content