भुसावळात व्यावसायिकाची दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील आदित्य लॉन समारून एका व्यावसायिकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी ६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, संजीव माधव कुरकुरे वय  ५२ रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी व्यावसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. ६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता संजीव कुरकुरे भुसावळ शहरातील आदित्य लॉन येथे त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीई  ६८६५) ने आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क करून कामानिमित्त निघून गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. ही घटना लक्षात आल्यानंतर कुरकुरे यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रमन सुरळकर हे करीत आहे.

Protected Content