भरधाव बसच्या धडकेत अनोळखी पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने पायी जाणाऱ्या अनोळखी व्यक्तीला मागून जोरदार धडक दिल्याने पदचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बसचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अधिक माहिती अशी की, जळगाव डेपोतील जळगाव-श्रीगोंदा जाणारी बस क्रमांक (एमएच ११ बीएल ९३८५) आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास जळगाव औरंगाबाद रोडवर रेमंड चौफुलीवरून जात असतांना एका पायी जाणाऱ्या अनोळखी पदचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेत पदचाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान, घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तातडीने मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात रवाना करण्यात आला आहे. दुपारपर्यंत मयताची ओळख पटलेली नव्हती. अपघात झाल्यानंतर बस एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे तर बसचालकाला ताब्यात घेतले आहे. बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content