Home क्राईम दुचाकीधारकाला लाकडी दांडक्याने मारहाण

दुचाकीधारकाला लाकडी दांडक्याने मारहाण


जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भंडारी मेडीकल जवळ दुचाकी जोरात घेवून जाण्याच्या कारणावरून एका तरूणाला लाकडी दांडक्याने मारहाण करून हाताला दुखापत करून गंभीर जखमी केल्याची घटना १४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी अखेर मंगळवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, गणेश दिनकर बागुल वय २५ रा. मोहाडी ता. जामनेर हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता गणेशने त्याचा मित्र रविंद्र यांची दुचाकीने जळगाव शहरातील भंडारी गल्लीत आला होता. त्यावेळी दुचाकी जोरात घेवून जात असल्याचा रागातून संशयित आरोपी दिपक श्यामलाल प्रकाशे वय ३२ रा. मोहाडी ता. जामनेर याने हातातील लाकडी दांडक्याने गणेश बागुल याच्या हातावर मारहाण केली. त्यामुळे गणेशचा हात फ्रॅक्चर झाला. त्यामुळे त्याला जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर उपचार घेतल्यानंतर गणेश बागुल याने शहर पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणारा दिपक प्रकाशे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound