खामगाव प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे साजरा करण्यात आला आहे.
सर्वप्रथम मराठा महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ माने, रमाकांतजी गलांडे यांनी पूजन केले. महासंघाचे जिल्हा सरचिटणीस किशोर भोसले, शहराध्यक्ष संजय शिनगारे, शहराध्यक्ष राजेश मुळीक, नगरसेवक प्रवीण कदम, नगरसेवक हिरालाल बोर्डे, महिला महासंघ जिल्हाध्यक्ष अनिता तनपुरे यांनी माल्यार्पण करून पूजन केले. छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या श्वारूढ पुतळ्यास राज्याभिषेकदिनी अभिवादन केले. याप्रसंगी मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष राम बोन्द्रे, दिगंबर गलांडे, चंद्रकांत रेठेकर, कल्याण गलांडे, विकास चव्हाण, महेंद्र पाठक, नरेंद्र मावळे, तानाजी राऊत, संभाजी तनपुरे, सुभाष शेळके, शशी वखरे, देविदास सरोदे, संजय मोहिते, महादेव सुकाळे, सुनिल भुसारे, गजानन केवारे, गजानन घाडगे, भानुदास पवार, दीपक केवारे, संजय शिंदे, राजू बोरकर, संतोष येवले, किसना राऊत, विशाल घोडके, निखिल घाडगे, आकाश खरपाडे, सागर मोरे, सुनिल सातपुते, सुरज साबळे, अनिकेत मुळीक, निखिल घाडगे, यांच्यासह महिला भगिनी व सर्व शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.