धरणगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील उखळवाडी येथील ७५ वर्षीय महिला शौचालयाला गेले असता शेतातील विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कलाबाई छगन पाटील (वय-७५ रा. उखळवाडी ता.धरणगाव) असे मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील उखळवाडी गावात कलाबाई पाटील या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. गुरूवार २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता उखळवाडी गावातील शेतात शौचालयासाठी गेल्या असता सदरील वृध्द महिला विहिरीत पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर गावातील नागरिकांनी ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यांना तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. या प्रकारणी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीम हे करीत आहे.