चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोरखेड खुर्द येथील ३५ वर्षीय तरूण घरातून काहीही न सांगता बेपत्ता झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील बोरखेड खुर्द येथील सोमनाथ प्रभाकर पाटील (वय-३५) हा घरात कोणाला काही एक न सांगता निघून गेला. दरम्यान सोमनाथ प्रभाकर पाटील हा २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथे एका रोडवर उभा असताना तेथून बेपत्ता झाला. घरच्यांनी आजपावेतो परिसर वा नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता सोमनाथ मिळून आला नाही. तत्पूर्वी घरातील सदस्यांना सोमनाथ पाटील हरवल्याचा स्पष्ट झाल्यानंतर भाऊ अजबराव पाटील खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात हरवल्याची नोंद घेण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास अविनाश पाटील हे करीत आहेत.