कंकराज लघुपाट तलावाचे १०० टक्के पुनर्भरण; १२५ हेक्टर ओलीताखाली येणार

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील कंकराज लघुपाट तलावाचे तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणाच्या पाण्यावरून १०० टक्के पुनर्भरण करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तर  सव्वाशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.  गुराढोरांचे पाण्याची ही प्रश मार्गी लागला आहे.

जवळपास सव्वा ते दीड महिन्यापासून तामसवाडी बोरी धरणाचे पाणी हे नदी द्वारे सोडले जात आहे. या पाण्यातून कंकराज लघुपाट तलावाचे पुनर्भरण करण्यात यावे, असे निवेदन माजी सरपंच प्रेमानंद पाटील व ग्रामस्थ यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्याकडे दिले होते. त्याची दखल घेऊन आमदार चिमणराव पाटील यांनी बोरी अभियंत्यांना पुनर्भरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 24 ऑगस्टपासून बोरी धरणाचे उजव्या पाटचारीद्वारे व वाकड्या पूल नाल्यातून असे ३३ कीमी अंतर पार करून हे पुनर्भरण करण्यास सुरुवात करण्यात आली होती. आज जवळपास सव्वा महिन्यानंतर या पाण्याद्वारे तलावाचे १०० टक्के पुनर्भरण झाले आहे. लघुपाट तलाव ओव्हरफ्लो झाल्याने ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान या पुनर्भरण मुळे कंकराज, भिलाली या गावातील १२५ हेक्‍टर शेती क्षेत्र हे ओलिताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांमधून विशेष आनंद व्यक्त होत आहे. या पुनर्भरण मुले गुरे, ढोरे यांचीही वर्षभराची पाणीटंचाईची समस्याही दूर झाली आहे. विशेष म्हणजे कंकराज, महाळपुर, शेवगे बु या गावांच्या तात्पुरता पाणीपुरवठा योजना या पाटतलावावर आहेत. गेल्या टिनन वर्षा पासून असे पुनर्भरण करण्यात आले आहे. तालुक्यात पावसाने कधीची सरासरी ओलांडली असून ओला दुष्काळाचे सावट हे सर्वत्र निर्माण झाले आहे.

Protected Content