मुंबई प्रतिनिधी । बिहारमधील एनडीएच्या विजयानंतर भाजपचे नेते आ. आशीष शेलार यांनी राज्यातील महाविकास आघाडीची खिल्ली उडवत जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
बिहार निवडणुकांमधील विजयानंतर भाजपामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. तसंच अनेकांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंदेखील कौतुक केलं आहे. दरम्यान, या विजयानंतर भाजपाचे नेते आ. आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

या संदर्भात शेलार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसने महाराष्ट्रात हातात धनुष्यबाण धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रातदेखील जनतेच्या घड्याळाचे काय सांगावे टायमिंग? पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच! त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजी फडणवीस यांचे अभिनंदन, असं म्हणत शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
तर दुसर्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भ्रष्टाचारी काँग्रेससोबत सलगी केलेलेल्या जंगलराज का युवराजला बिहारच्या जनतेनं नाकरलं. महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेससोबत जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज युती करुन बसलेत. समझनेवाले को इशारा काफी है, असे शेलार यांनी यात म्हटले आहे.


