Home आरोग्य जिल्ह्यात आता 571 वर पोहचली ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या; जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची...

जिल्ह्यात आता 571 वर पोहचली ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या; जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची माहिती


जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टीव्ह रुग्ण) संख्या 571 पर्यत खाली आली आहे. 68 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 51 हजार 707 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.56 टक्क्यांपर्यत पोहोचल्याची मा‍हिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

जिल्ह्यात काल 8 नोव्हेंबर पर्यंत एकूण 571 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अवघी 190 इतकी आहे यातील 26 रुग्ण आयसीयुमध्ये असून 94 रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु आहे. तर 381 रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1272 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या जिल्ह्यातील मृत्यूदर 2.38 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 लाख 93 हजार 967 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53 हजार 550 (18.21 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या 198 अहवाल प्रलंबित आहे. सध्या जिल्ह्यात 369 व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत तर 107 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.


Protected Content

Play sound