Home क्राईम लोखंड कापण्याची मशीन चोरणारा पकडला

लोखंड कापण्याची मशीन चोरणारा पकडला

0
38


 

रावेर : प्रतिनिधी । बांधकाम चालू असलेल्या घरातून लोखंडी सळया कापण्याचे मशीन चोरून नेणार्याला पकडून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मुद्देमाल हस्तगत केला आहे .
रावेर पोलीस ठाण्यात गजानन वाघ (रा निंभोरा ता रावेर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता चेतन महाजन (स्वामी नगर रावेर ) यांचे घरबांधकाम चालू असताना त्यांचे उघडे घरात ठेवलेली लोखंडी अँगल कापण्याची मशीन व प्लास्टिक जार चोरीला गेला होता

पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शना खाली हे कॉ जितेंद्र नारेकर, पो ना महेंद्र सुरवाडे, पो कॉ सुरेश मेढे, पो कॉ मनोज मस्के यांनी तपास केला संशयित आरोपी अशोक शिंदे (रा भोईवाडा रावेर) यांना ताब्यात घेतले आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याने त्याला अटक केली व तपासात मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


Protected Content

Play sound