Home क्राईम गुटखा विक्री करणारा फरार आरोपी अटकेत

गुटखा विक्री करणारा फरार आरोपी अटकेत

0
27

भुसावळ प्रतिनिधी । गुटखा विक्री करण्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला आज शहरातील आठवडे बाजार भागातून अटक करण्यात आली.

याबाबत वृत्त असे की, जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात ५ गुरनं-७०/२०१९ भा द वि कलम- ३२८, २७३,२७२,१८८ प्रमाने गुटका विक्री बाबत प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यातील विक्की अशोक दुसेजा (वय-२५ रा सिंधी कॉलनी भुसावळ) हा आरोपी सदर गुन्हा घडल्या पासून फरार होता. संबंधीत आरोपी हा भुसावळ शहरात आठवडे बाजार भागात आल्याची गुप्त बातमी मिळाल्यावरून त्याला आज अटक करण्यात आली. त्याला अटक करून सहाय्यक पौजदार आनंदसिंग पाटील यांच्या ताब्यात दिले आहे. ही
कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलिस निरीक्षक देविदास पवार यांचा मार्गदर्शनखाली पोहेका सुनील जोशी, पोना रविंद्र बिर्‍हाडे, पोका विकास सातदिवे व अक्षय चव्हाण यांच्या पथकाने केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound