गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी पाचोरा-भडगावमध्ये मेळावे

पाचोरा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी १७ व १८ रोजी पाचोरा-भडगाव मतदारसंघात मेळावे होणार आहेत.

आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. यात दिनांक १७/०३/२०१९ रोजी पाचोरा तालुक्यातील नांद्रा (लोढाया जीन)सकाळी १०.०० वाजता; पिंपळगाव दुपारी १.०० वाजता तर जारगाव (नाथ मंदिर) सायं. ४.०० वाजता मेळावे होती. तर दि. १८ रोजी भडगाव तालुक्यातील नगरदेवळा (पाटील मंगल कार्यालय) सकाळी १०.०० वाजता: कोळगाव दुपारी १.०० वाजता; भडगाव दुपारी ४.०० वाजता (नारायण मंगल कार्यालय) तर गिरड सायं. ७.०० वाजता मेळावे होणार असल्याचे सांगण्यात आले.

या सर्व मेळाव्यांना जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, जळगाव लोकसभेचे उमेदवार गुलाबराव देवकर, अरुणभाई गुजराती, डॉ. सतीश आण्णा पाटील, गफ्फार मलिक, वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप, ईश्‍वरबाबूजी जैन, विलास पाटील, राजीवदादा देशमुख, सौ. कल्पना ताई पाटील, ललित बागुल , अनिल भाईदास पाटील, योगेश देसले, खलील दादामिया देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार दिलीप वाघ यांनी केले आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेला गटनेते संजय वाघ, नितीन तावडे(विधानसभा क्षेत्रप्रमुख), सतीश नारायण चौधरी (शहर अध्यक्ष), वासूदेव माळी(नगरसेवक), सुभाष पाटील(नगरसेवक), विकास पाटील(नगरसेवक), संतोष जाधव(तालुकाध्यक्ष), प्रशांत पवार(नगरसेवक), श्याम भोसले(नगरसेवक),, अशोक मोरे(नगरसेवक), ललित वाघ( पं.स. सदस्य), रेखाताई पाटील, मंगलाताई पवार, सरला पाटील, अझहर खान, रणजीत पाटील(नगरसेवक), पी. डी. भोसले(नगरसेवक), भूषण वाघ(नगरसेवक), विजय कडू पाटील तालुकाध्यक्ष, जयश्री मिस्तरी, सीताराम पाटील, मंगला शिंदे, बशीर बागवान, मोहमद मिस्तरी, योजनाताई पाटील, दिनकर पाटील,(युवक अध्यक्ष), हर्षल पाटील(युवक अध्यक्ष), स्वप्नील पाटील(युवक अध्यक्ष) आदी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content