Home क्राईम राकेश सपकाळे मर्डर : लाडू गँगवर हत्येचा संशय; दोघे ताब्यात

राकेश सपकाळे मर्डर : लाडू गँगवर हत्येचा संशय; दोघे ताब्यात

0
147

जळगाव प्रतिनिधी । माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव राकेश सपकाळे यांच्यावर लाडू गँगने हल्ला करून त्यांचा खून केल्याची माहिती समोर आली असून यातील दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

याबाबत वृत्त असे की, काल रात्री साडेअकराच्या सुमारास माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे (वय २८) हा स्मशानभूमी परिसरातून येत असताना त्याच्यावर अज्ञात तरूणांनी हल्ला चढविला. यात त्याचा मृत्यू झाला. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिपेठेतील काही तरूणांसोबत त्याचे आधी भांडण झाले होते. यातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राकेश आणि त्याच्या भावासोबत शनिपेठेतील काही तरूणांचे आधी भांडण झाले होते. अलीकडेच त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. यातूनच हा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. यात लाडू गँगचे नाव समोर आले असून यातील गणेश व आकाश उर्फ भुर्‍या यांनी आपल्या सहकार्‍यांसह हा हल्ला चढविल्याचेही स्पष्ट झाले आहे. यामुळे पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, राकेश हा आपला मोठा भाऊ राजू उर्फ बाबू याचा गुरूवारी वाढदिवस असल्याने याची जय्यत तयारी करण्यात आली होती. वाढदिवसाच्या होर्डींगसह अन्य तजवीज तरून राकेश हा आपला दुसरा भाऊ सोनू व सहकारी सलमान यांच्यासह घरी येत असतांनाच त्याच्यावर हल्ला चढविण्यात आला असून यातच त्याचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound