मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह ५ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना ही संमती देण्यात आली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थिएटर्स, नाट्यगृहं, शाळा सगळं बंद करण्यात आल्या होत्या . आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे.
सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं एकूण प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांसह उद्यापासून सुरु होणार आहेत. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्युट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे