शनिपेठ, एमआयडीसीत आरसीपी प्लाटूनच्या बंदोबस्तात कोम्बिंग ऑपरेशन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी व शनिपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आरसीपी प्लाटूनच्या 24 कर्मचार्‍यांच्या तुकडीसह सोमवारी मध्यरात्री कोब्मिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे. या कारवाईत हद्दपार असलेले दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

एमआयडीसी व शनिपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रात्री 11 ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंतच्या या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 36 हिस्ट्रीशीटरची तपासणी करण्यात आली. तर शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक वर्षापासाठी हद्दपार करण्यात सागर सुरेश सपकाळे उर्फ बी.डी वय 23 व सागर आंनदा सपकाळे उर्फ झंपर्‍या वय 22 दोन्ही रा. कोळीपेठ हे दोघेही मिळून आले आहे. दोघांना ताब्यात घेवून न्यायालयात हजर करण्यात आले.

पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली शनिपेठ तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. अचानकपणे केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली होती. आरसीपी प्लाटूनच्या 24 कर्मचार्‍यांच्या तुकडीसह बंदोबस्तात रात्री 11 वाजेच्या सुमारास या कोम्बिंग ऑपरेशनला एमआयडीसी परिसरात सुरुवात झाली. पोलीस उपअधीक्षकांसह एमआयडीसी परिसर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांनी पिंजून काढला. यात रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर संशयितांची घरी जावून तपासणी करण्यात आली.  एमआयडीसी हद्दीत ऑपरेशन राबविल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिपेठ पोलीस निरिक्षक तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचारी व आरसीपी प्लाटूनच्या बंदोबस्तात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशनमध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी मुंबई पोलीस अ‍ॅक्ट 55 प्रमाणे एक वर्षासाठी हद्दपार केलेल्या धडकन या गुन्हेगारांच्या टोळीतील सुरेश सुरेश सपकाळे उर्फ बीडी  व सागर आनंदा सपकाळे उर्फ झंपर्‍या हे दोघेही घरी मिळून आले. दोघांना ताब्यात घेवून कार्यवाही करण्यात आली.

 

Protected Content