Home धर्म-समाज खामगाव येथे साऊंड असोसिएशनतर्फे उद्या एक दिवसीय धरणे आंदोलन

खामगाव येथे साऊंड असोसिएशनतर्फे उद्या एक दिवसीय धरणे आंदोलन

0
71

खामगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र टेन्ट डीलर वेल्फेअर असोसिएशन बुलढाणा जिल्हा  टेन्ट लाइटिंग साऊंड असोसिएशनतर्फे उद्या (दि.२ नोव्हेंबर) रोजी राज्यात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र टेंनंट डीलर वेल्फेअर बुलढाणा जिल्हा लाइटिंग साऊंड असोसिएशन व खामगाव तालुका टेन्ट लाइटिंग साऊंड असोसिएशन तर्फे  कोरोना च्या शर्ती व तिचे पालन करून व्यावसायिकांना परवानगी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी उद्या २  नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २  वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कोरणा प्रादुर्भावामुळे  लॉक डाऊन जनता कर्फ्यू व कार्यक्रम स्थगिती दिली आहे. त्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. याबाबत पालकमंत्री खासदार, आमदार यांना वेळोवेळी निवेदने दिली आहेत, मात्र त्यांच्या कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. केंद्र शासन व राज्य शासन यांनी सुद्धा व्यवसायिक बंधूंवर उपासमारीची पाळी आली असताना कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे covid-19 चे सर्व नियम पालन करून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती खामगाव तालुकाध्यक्ष राहुल कन्हाळे, तालुकाध्यक्ष व तालुका उपाध्यक्ष अजय निळे, सचिव निर्मल जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 


Protected Content

Play sound