Home Cities यावल निळे निशाण संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी विलास भास्कर यांची नियुक्ती

निळे निशाण संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी विलास भास्कर यांची नियुक्ती


यावल प्रतिनिधी । शहरातील निळे निशान संस्थेच्या कार्यकारिणीत यावल तालुकाध्यक्षपदी विलास भास्कर यांची निवड करण्यात आली. ही निवड संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी केली.

कार्यकारिणी निवड याप्रमाणे – तालुकाध्यक्ष विलास भास्कर, उपाध्यक्ष संतोष गुप्ता, तालुका कार्याध्यक्ष विष्णू भालेराव, सरचिटणीस अशोक खंडू तायडे, संघटक बाळू अडकमोल, उप संघटक पराग वसंत वाघ, अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

संघटनेच्या माध्यमातून समाजातील नागरीक आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आवाज उठवावा हे ध्येय आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष राजू सावर्णे, उत्तर महाराष्ट्र नाशिक विभाग प्रवक्ता ॲड. गौतम साळुंखे, प्रमोद पारधे, दीपक लोहार, महेंद्र महाले, विक्की गजरे, योगेश मोरे, आकाश सपकाळे, मोरे सर यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound