नाथाभाऊंच्या वाहनाचे  टायर फुटले

 

जळगाव : प्रतिनिधी । गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असतांना एकनाथराव खडसे बसलेल्या वाहनाचे टायर फुटून अपघात झाल्याची घटना आज सायंकाळी धरणगाव- जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर घडली.

या अपघातात एकनाथराव खडसे सुखरूप बचावले आहेत. अपघातग्रस्त वाहन जागेवरच सोडून दुसर्‍या वाहनाने खडसे हे जळगावकडे रवाना झाले
अमळनेर येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज जिल्हा दौर्‍यावर होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम आटोपून एकनाथराव खडसे हे त्यांच्या खाजगी वाहनाने एम.एच.19 सी.ई. 19 ने जळगावकडे परतत होते. यादरम्यान धरणगाव व जळगावदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या वाहनाचे अचानक टायर फुटले. चालकाने प्रसंगवधान राखून चारचाकीवर नियंत्रण मिळविले आणि गाडी थांबविली.

Protected Content