भुसावळ प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयातल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पुन्हा नॉन कोविड रूग्णसेवा सुरू करण्याची मागणी भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. निलेश (उर्फ नि.तु.) पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
डॉ. निलेश पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये सध्या करोना संक्रमित रुग्ण आहेत. मागील आठवड्यापासून त्यांची संख्या पण ४ ते १० च्या आतच आहे. यामुळे ट्रॉमा केअर सेंटरची पूर्ण वास्तू फक्त कोरोना चाचणीसाठी (आरटीपीसीआर) वापरण्यात येत आहे.मागील १५ दिवसांमध्ये दररोज फक्त ५ ते १५ असेच रुग्ण तपासणीसाठी येत असून,या रुग्णांसाठी संपूर्ण ट्रॉमा केअर सेंटरची बिल्डिंग अडकवणे निश्चितच संयुक्तिक नाही. संबंधीत तपासणी ही ग्रामीण रूग्णालया मध्ये सुद्धा करता येण्यासारखी आहे.
यात पुढे म्हटले आहे की, यामुळे जे इतर कोविड सोडून आजारी रुग्ण आहेत त्यांची यामुळे होणारी गैरसोय थाबेल. त्यांना ट्रॉमा केअर सेंटर मधेच उपचार मिळतील. आणि त्यांच्या पुढे जाण्याचा शाररीक त्रास आणि आर्थिक त्रास पण वाचेल. शिवाय आरोपी,जेल मधील कैदी यासाठी पोलिसांना शिरसोली रोड वरील रुग्णालयात जाण्याचा पण त्रास आणि वेळ वाचेल. यामुळे भुसावळ मधील ग्रामीण रुग्णालयात सर्व करोना रुग्णासाठी चाचणी,तपासणी,भरती करावी. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये इतर रुग्णासाठी उपचाराची सोय करावी आणि जनतेच आणि पोलिसांचा त्रास वाचवावा असे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनाही पाठविण्यात आल्या आहेत.