मोटार सायकल चोर बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ प्रतिनिधी । शहरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग 5 गुरण 905/2020 भा द वि कलम-379,34 प्रमाणे दिनांक 24.10.2020 रोजी 13.52 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी नामे रमजान हमीदउल्ला शेख (वय-55,रा.भुसावळ) यांची मुलगी कामा निमित्त दिनांक.21.10.2020 रोजी 13.52 वाजता भुसावळ शहरातील आई हॉस्पिटलकडे मोटार सायकल ऍक्टिव्ह लावली असता कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचोरे यांनी मोटारसायकल चोरी बाबत दिलेल्या सूचना व मार्गदर्शनावरून पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याना मिळालेल्या गुप्त बातमी वरून संशयित आरोपी भिकन देवा कानोडे वय-21 व जयेश दिपक जराड वय-20 दोही रा.भारत नगर भुसावळ संशयित विधी संघर्ष बालक वय-17 रा.अंजाळे अशाना भुसावळ शहरातील भारत नगर भागातून ताब्यात घेण्यात आले होते.          

सदर गुन्ह्यातील अटक आरोपी म यांच्या कडून पोलीस कस्टडी दरम्यान दिनांक 31.10.2020 रोजी चोरीची दोन मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई 

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरी. अनिल मोरे,मंगेश गोटला,स.फौ. तस्लिम पठाण, पो.हे.का. इरफान काझी,अयाज सैय्यद,पो.ना.रवींद्र बिऱ्हाडे,किशोर महाजन, रमण सुरळकर, निलेश बाविस्कर, दीपक जाधव, उमाकांत पाटील, पो.का.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी ,कृष्णा देशमुख,चेतन ढाकणे, योगेश महाजन,सुभाष साबळे, सचिन चौधरी अशांनी केली आहे.

 

Protected Content