Home Cities जळगाव एलसीबी पोलीस निरीक्षकपदी किरणकुमार बकाले

एलसीबी पोलीस निरीक्षकपदी किरणकुमार बकाले

0
66


जळगाव प्रतिनिधी । स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. रोहम यांच्या जागी प्रभारी पोलीस निरिक्षकपदी किरणकुमार बकाले यांची नियुक्ती झाली आहे. किरणकुमार बकाले यांनी आज पदभार स्विकारलाय.

मेहुणबारे येथील लाखोंच्या गुटखा प्रकरणात यापूर्वीच पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सात पोलिस कर्मचाऱ्यांसह मेहुणबारे येथील सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना निलंबित केले आहे. याच गुटखा प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांची उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे. रोहम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी किरणकुमार बकाले यांची नियुक्त झाली आहे. बकाले यांनी आज सायंकाळी आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे.


Protected Content

Play sound