Home क्राईम न्यूझीलंडमधील गोळीबारातील मृतांची संख्या ४९ वर

न्यूझीलंडमधील गोळीबारातील मृतांची संख्या ४९ वर


वेलिंग्टन (वृत्तसंस्था) न्यूझीलंडच्या साऊथ आयलंड शहरातील दोन मशीदींमध्ये अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारातील मृतांची संख्या ४९ तर जखमींची संख्या २० वर वर पोहचली आहे. दरम्यान, या घटनेमुळे न्यूझीलंड प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटकही केली आहे. या हल्लेखोरांकडून मोठ्या प्रमाणात बॉम्ब आणि इतर ज्वलनशील उपकरणं जप्त करण्यात आली आहेत.

 

पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन यांनी आजचा दिवस न्यूझीलंडच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे जाहीर केले आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस पूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या गोळीबारात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, अज्ञाताने केलेल्या या गोळीबारात अनेक जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ख्राइस्टचर्चमधील अल नूर मशिदीत काही तासांपूर्वी हा गोळीबार सुरू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. शुक्रवारच्या नमाजसाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव या मशिदीत येत असतात. त्यामुळे मशिदीत गर्दीही झाली होती. या गर्दीचा फायदा घेत काळे कपडे आणि हेल्मेट घालून एक अज्ञात इसम अल नूर मशिदीत शिरला. कोणालाही कळायच्या आतच त्याने बेछूट गोळीबार सुरू केला. क्रिकेट मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये आलेल्या बांग्लादेशचा संघ यावेळी मशिदीत हजर होता. संघातील सर्व खेळाडूंना सुरक्षित मागच्या दाराने बाहेर काढण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound