दिव्यांग बांधवांचे विविध मागण्यांचे निवेदन

 

फैजपूर, प्रतिनिधी । फैजपूर दिव्यांग सेना आणि लोणार सरोवर अपंग विकास सेवाभावी संस्था फैजपूर यांच्यातर्फे आज दि २७ ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले

दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन यांच्या मार्गदर्शनाने व फैजपूर दिव्यांग सेना शहराध्यक्ष नितीन महाजन यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी चव्हाण फैजपूर नगरपरिषद यांना नगरपालिकेच्या स्वउत्पन्नातून दिव्यांग बांधवांना कल्याणकारी पाच टक्के निधी, व्यवसायासाठी व्यापारी संकुलनात गाळा, घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये ५० टक्के सवलत मिळावी व प्रांताधिकारी कार्यालयात महेश साळुंके यांना शासनाचे अंत्योदय रेशन कार्ड योजनेत शासकीय नियमानुसार सामाविष्ट करून दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा असे निवेदन देण्यात आले.तसेच मागण्या मान्य न झाल्यास डिसेंबर २०२० मध्ये दिव्यांग बांधव नागरपालिकेसमोर आमरण उपोषण करतील असा इशारा देण्या आला याप्रसंगी त्यावेळी दिव्यांग सेना फैजपूर शहर अध्यक्ष नितीन महाजन, उपाध्यक्ष ललित वाघूळदे, उपाध्यक्ष नाना मोची,सचिव मुन्ना चौधरी, सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हे, लोणार सरोवर अपंग विकास संस्था अध्यक्ष अयसान कुरेशी, रोहित तायडे, आमीनाबी तांबट, शे.रियाज, शे.रईस, मो.वशिम, शे.अय्युब, अल्ताफ, दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Protected Content