रावेर, प्रतिनिधी । येथे मुस्लिम बांधवांच्या आगामी ईद -ए-मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक आयोजकांची बैठक पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आली होती.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नयेयासाठी जिल्हाधिकारी यांनी सार्वजिनिक स्वरूपात गर्दी टाळण्यासाठी आदेश जारी केले आहेत. यानुसार ‘ईद-ए-मिलाद’ या सणाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक न काढण्याच्या सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी बैठकीत दिल्यात. बैठकीला पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, एपीआय शीतलकुमार नाईक यांनी योग्य मार्गदर्शन केले. सदर बैठकीस मुस्लिम बांधव, मौलाना, मुस्लिम पंच कमिटी सदस्य असे उपस्थित होते.