Home क्रीडा बांगलादेशचा क्रिकेट संघ गोळीबारातून बचावला

बांगलादेशचा क्रिकेट संघ गोळीबारातून बचावला

0
33

वेलींग्टन वृत्तसंस्था । न्यूझिलंडमधील एका मशिदीत झालेल्या गोळीबारातून बांगलादेशच्या क्रिकेट संघाचे खेळाडू बचावल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

न्यूझिलंडमधील ख्राईस्टचर्च शहरातील एका मशिदमध्ये गोळीबार झाला असून यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गोळीबार होत असतांना न्यूझिलंडच्या दौर्‍यावर असणार्‍या बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडूदेखील या परिसरात होते. हे खेळाडू या गोळीबारातून सुदैवाने बचावले आहेत. मात्र या घटनेमुळे त्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते जलाल युनिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडू बसमध्ये होते आणि मशिदीत जाण्याची तयारी करत असतानाच गोळीबार झाला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound