जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या कोअर समितीच्या बैठकीस आज प्रारंभ करण्यात आला असून खडसे यांनी पक्षत्याग केल्यानंतर होणार्या या बैठकीत मंथन करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयात आज पक्षाच्या कोअर समितीची बैठक सुरू झाली आहे. यात माजी मंत्री आ. गिरीश महाजन व प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक हे मार्गदर्शन करत आहेत. या अनुषंगाने बैठक सुरू झाली असून यात बैठकीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, खासदार उन्मेश पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार चंदूलाल पटेल, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, महापौर भारती सोनवणे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीनंतर ब्राह्मण संघात शहर व ग्रामीण पदाधिकार्यांची बैठक होणार आहे.