फैजपूर, प्रतिनिधी । सावदा येथे गजानन हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोड प्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी रावेर यावल तालुक्यातील संघटना आक्रमक झाल्या असून शनिवारी प्रांताधिकारी कैलास कडलग यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज यांची उपस्थिती होती.
प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या दालनात जनार्दन महाराज यांच्या उपस्थितीत गजानन हॉस्पिटलचे डॉ. सुनील चौधरी, डॉ. अतुल सरोदे, डॉ. व्ही. जे. वारके, डॉ. भरत महाजन, डॉ. विलास पाटील यांच्या सोबत सर्व डॉक्टर यांनी या हॉस्पिटलमध्ये येऊन तोडफोड करणे, डॉक्टर, परिचारक यांना मारहाण करणे यामुळे डॉक्टर यांचे मनोबल खचले जात आहे. त्यामुळे आरोपी यांना तात्काळ अटक करावी व त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली. डॉक्टर आज दडपणखाली काम करत असल्याच्या यासाठी प्रशासन यांनी आमच्या भावना समजून प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या. याप्रसंगी डॉ. अतुल सरोदे यांनी डॉ. सुनील चौधरी यांच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली व या घटनेचे सी. सी.टी. व्ही फुटेज हे पोलिस यांना दिले आहे. त्या आधारे आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली तसेच यावेळी महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी या रावेर यावल तालुक्यातील डॉक्टर या भागात तन मन या भावनेतून रुग्णांची सेवा देत आहेत. या भागात डॉक्टर चांगले प्रकारे सेवा देत आहेत त्यामुळे या भागात डॉक्टर वर कोणी हल्ले केले तर हॉस्पिटलची नास धुस करत असेल तर प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली.
यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी सावदा पो.स्टे.प्रभारी अधिकारी राहुल वाघ यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा करून घटनेची माहिती घेतली या बाबत लवकरच आरोपींना अटक केली जाईल त्या दृष्टीने तपास करावा अश्या सूचना दिल्या. यावल रावेर तालुका वैद्यकीय संघटना, निमा शाखा सावदा फैजपूर, रावेर तालुका होमिओ पॅथी संघटना यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले यावेळी डॉ गुलाब पाटील, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. शैलेश खाचणे, डॉ. अतुल सरोदे, डॉ.व्ही .जे .वारके, डॉ चंद्रकांत चोपडे, डॉ. भरत महाजन, डॉ. विलास पाटील, डॉ. उमेश पिंपळे, डॉ. शंतनु सरोदे, डॉ. विशाल चौधरी, डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. निलेश पाटील, डॉ. संगीता महाजन, डॉ. उमेश चौधरी यांच्या सह यावल रावेर परिसरातील डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.