जळगाव प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे व आर्थिक साह्य करावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील निष्पाप बालकांची क्रूरपणे हत्या व मुलीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेतील नराधमांना पोलीस प्रशासनाने अटक केलेले आहे तरी राज्य सरकारने नियमानुसार कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत करावी राज्य सरकारचे नियमानुसार धोरण आहे त्यानुसार हे कुटुंब दारिद्र्यरेषेखालील हातावर मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे त्या कुटुंबास राज्य सरकारांचे समाज कल्याण विभागाकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत शेती किंवा सरकारी नोकरी कायमस्वरूपी सेवेत घेणे हे कुटुंब परत स्वाभिमानाने व मानसन्मानाने आपले जीवन जगेल झालेल्या घटनेतून दुःखातून सावरतील ची मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजूभाई सूर्यवंशी, महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, जिल्हा सरचिटणीस मिलिंद तायडे, युवक जिल्हाध्यक्ष रविभाऊ सपकाळे, राजेश काळे, संजय काळे, विकी तायडे, प्रताप बनसोडे, रोहित गायकवाड, सदानंद वाघ, गोविंद तायडे, नितीन सुरवाडे, गौतम निकम, महेंद्र मोरे, कमलाकर गाडे आदी उपस्थित होते. तसेच या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यांना आले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/449033412742649/