रावेर शालीक महाजन । तालुक्यातील बोरखेडा येथे रात्री झालेल्या चार भावंडांच्या खूनाचा तपास जळगावचे सहाय्यक पोलीस अधिक्षक आयपीएस अधिकारी कुमार चिंथा यांच्या नेतृत्वाखालील ‘एसआयटी’ करणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली आहे.
रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे चार भावंडांची कुर्हाडीने वार करून क्रूर हत्या झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अत्यंत गरीबीत राहणार्या दोन भाऊ व दोन बहिणींची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी झाली याची माहिती अद्याप तरी समोर आलेली नसली तरी या प्रकारामुळे रावेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, आज सकाळी या चार खूनांची माहिती समोर आल्यानंतर पोलीस अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेरचे निरिक्षक रामदास वाकोडे आदींनी बोरखेडा गाठून तेथील दुर्घटनेची माहिती जाणून घेतली.
दरम्यान, या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे म्हणाले की, बोरखेडा येथील प्रकरण हे अतिश गंभीर असून याचा तपास कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. यासाठी एक विशेष तपासणी पथक अर्थात एसआयटी गठीत करण्यात आली असून यात चार पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकार्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती देखील डॉ. मुंडे यांनी दिली.
दरम्यान, बोरखेडा येथील चार भावंडांच्या खूनात वापरण्यात आलेली कुर्हाड जप्त करण्यात आली असून फॉरेन्सीक तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू असल्याचे देखील डॉ. प्रवीण मुंडे यांनी सांगितले.
खालील व्हिडीओत पहा डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या माहितीचा व्हिडीओ.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/989551298209377