देशात २४ तासांत आढळले नवीन ६७ हजार करोनाबाधित रुग्ण

 

नवी दिल्ली , वृत्तसंस्था ।मागील २४ तासांत देशांत ६७ हजार ७०८ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून ६८० पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७३,०७,०९८ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सध्या ८,१२,३९० कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण असून ते रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तसेच आजवर ६३,८३,४४२ रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने ते बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर १,११,२६६ कोरोनाबाधित रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे.

Protected Content