Home क्राईम जळगावातील गेंदालाल मिल परिसरात दुचाकी जाळली

जळगावातील गेंदालाल मिल परिसरात दुचाकी जाळली


IMG 20190313 WA0012 1

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गेंदालाल मील परिसरात दोन दिवसांपूर्वी रिक्षा जाळल्याचे प्रकरण ताजे असतांनाच मंगळवारी मध्यरात्री पुन्हा एक दुचाकी जाळण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मील भागात गुलाब गौस मेहबूब खान हा तरुण राहतो. मंगळवारी रात्री नेहमी प्रमाणे गुलाब गौस यांनी आपली दुचाकी क्रमांक (एमएच.१८.एक्स.६५४८) ही घराबाहेर लावली होती. त्यानंतर साधारण १२:४५ वाजेच्या सुमारास गल्लीतील एक महिलेने दुचाकी जळत असल्यामुळे आरडाओरड सुरु केली. परिसरातील नागरिकांनी पाणी ओतून आग विझवली. परंतु तोपर्यंत दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते. आज दुपारी शेवटचे वृत्त हाती आली तेव्हा, याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound