Home Cities जळगाव राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शुभांगी भारदे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound