Home Uncategorized आता भुसावळात आयकर खात्याचे छापे

आता भुसावळात आयकर खात्याचे छापे

0
25


भुसावळ प्रतिनिधी । जळगावनंतर आता भुसावळमध्ये आयकर खात्याने वैद्यकीय व्यावसायिकावर छापे टाकल्याचे वृत्त असून या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच जळगावमधील काही ख्यातप्राप्त हॉस्पीटल्सवर आयकर खात्याने छापे टाकले होते. यात कोट्यवधींचे घबाड सापडल्याची चर्चा होती. यानंतर काल रात्री भुसावळातील काही हॉस्पीटल्सवर आयकर खात्याने धाड टाकल्याचे माहिती समोर आली आहे. यातील डॉ. जयंत धांडे यांच्या हॉस्पीटलमध्ये रात्री उशीरापर्यंत तपासणीची कारवाई सुरू होती. मात्र याबाबत संबंधीत खात्याच्या अधिकार्‍यांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला. रात्री उशीरापर्यंत येथे तपासणी सुरू होती.

दरम्यान, जळगाव पाठोपाठ भुसावळातील वैद्यकीय व्यावसायिकांकडे आयकर खात्याने आपला मोर्चा वळविल्याचे यातून दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound