जळगाव, प्रतिनिधी । उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या घटनेबद्दल उत्तर प्रदेश सरकारचा निषेध गुरुवारी 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करणेबाबत पत्र देण्यात आले. .
दिल्ली, कठुआ, हैदराबाद, उन्नाव व आता उत्तर प्रदेशातील हाथरस येथे चार नराधमांनी निष्पाप मुलीचे शेतातून अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्यानंतर पीडितेची जीभ छाटून, पाठीचा मणका मोडून तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून गळ्यात ३ फ्रॅक्चर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले. पंधरा दिवस मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली. घटनेच्या निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे देखील जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करणेबाबत पत्र दिले. यावेळी कार्याध्यक्ष भानुदास विसावे,पांडुरंग बाविस्कर, साहेबराव अहिरे, गणेश मोरे, विनोद खजुरे , प्रल्हाद विसावे, सुनील विसावे, बापू नेरकर,दीपक नेरकर, दीपक भारंबे आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/248984266523623