Home राष्ट्रीय पाकच्या गोळीबारात जवान शहीद

पाकच्या गोळीबारात जवान शहीद


 

श्रीनगर : वृत्तसंस्था । गुरुवारी सकाळपासून पाकिस्तानकडून कृष्णा घाटीमध्ये जोरदार गोळीबार केला जात आहे. यामध्ये लान्स नायक करनेल सिंह शहीद झाले आहेत. तर अन्य एक जवान जखमी झाला आहे.

एकीकडे चीनच्या सीमेवर तनाव असताना दुसरीकडे पाकिस्तानकडून कुरापती सुरुच आहेत. शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात भारताचे लान्स नायक शहीद झाले आहेत. भारतीय जवानांनीही पाकिस्तानला जोरदार प्रत्यूत्तर दिले

लान्स नायक करनल सिंह यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत, असे सैन्याने म्हटले आहे. जखमी जवानाचे नाव विरेंद्र सिंह आहे. त्याच्या डोळ्याला मार बसला आहे. विरेंद्र सिंह यांना राजौरीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. सोमवारी पाकिस्तानच्या राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. या काळात पाकिस्तानकडून मोर्टार डागण्यात आले होते. भारताकडूनही प्रत्यूत्तर देण्यात आले होते.


Protected Content

Play sound