मुंबई- बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव आखला गेल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. राजकीय पोळी भाजण्यासाठी मुंबई पोलिसांना, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा देशमुख यांनी केला.
मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सूरू होता. परंतु बिहारच्या निवडणुका समोर ठेवून काही राजकीय व्यक्तींनी आपली पोळी भाजण्यासाठी मुंबई पोलिसांना बदनाम केले आहे. त्यामुळे जनता त्यांना योग्य वेळी उत्तरे देईल. याचबरोबर दरम्यान मुंबई पोलिसांनी अतिशय चांगला तपास केला. बिहारचे डीजीपी यांनी मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तेच डीजीपी स्वेच्छा निवृत्ती घेत एका पक्षात गेले आहेत. अशी टिका गृहमंत्री देशमुख यांनी केली.