जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ऑफिसर फोरमचे पूनर्गठन करण्यात आले असून फोरमच्या अध्यक्षपदी विधी व माहिती अधिकार उपकुलसचिव डॉ.श्यामकांत भादलीकर यांची अध्यक्ष म्हणून तर सहायक कुलसचिव के.सी.पाटील यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र युनिर्व्हसिटीज ऑफिसर्स फोरम राज्यात कार्यरत असून या फोरमच्या जळगाव शाखेतील कार्यकारिणीचे नुकतेच पूनर्गठन करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वर्ग -१ च्या अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत नवीन कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली.
नुतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष – डॉ.श्यामकांत भादलीकर (उपकुलसचिव), उपाध्यक्ष- अनिल मनोरे (उपकुलसचिव) व सोमनाथ गोहिल (उपवित्त व लेखा अधिकारी), सचिव – केशव पाटील (सहायक कुलसचिव), सहसचिव- राजेश पाटील (विद्यापीठ उपअभियंता), कोषाध्यक्ष- आर.एन.सावळे (सहायक वित्त अधिकारी) फोरमचे राज्य प्रतिनिधी – डॉ.सुनील पाटील (जनसंपर्क अधिकारी) व फुलचंद अग्रवाल (सहायक कुलसचिव), सल्लागार श्री.श्रीराम.पाटील (कार्यकारी अभियंता)
या बैठकीला वरील पदाधिकाऱ्यांसह सहायक कुलसचिव व्ही.व्ही.तळेले, डॉ.आर.पी.पाटील, जी.एन.पवार, रामनाथ उगले, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनाली कांबळे आदी उपस्थित होते.