Home Cities जळगाव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


download 4

जळगाव (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त जळगावातील मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशनतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श पुरस्कार वितरीत केले जाणार आहे. तरी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचेआवाहन मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी केले आहे.

 

शहरासह जिल्ह्यात विविध सामाजिक कार्य राबविणाऱ्या मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनतर्फे महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श पुरस्काराचे वितरण दि.१४ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. राज्यात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, आरोग्य व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या व्यक्ती, संस्थांकडून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श पुरस्कारासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या माहितीचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. तरी प्रस्ताव दि.३१ मार्चपर्यंत दुकान क्रमांक ८, देशपांडे मार्केट, नवीन बसस्थानक शेजारी, जळगाव – ४२५००१ येथे पाठवावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८८८८८८२३७८ फिरोज शेख यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound