नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे आज निधन झालं आहे. एम्समध्ये उपचार सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

सुरेश अंगडी यांना दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. सुरेश अंगडी यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ६५ वर्षांचे सुरेश अंगडी यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंब आणि मोदी मंत्रिमंडळात शोककळा पसरली आहे. बेळगाव मतदारसंघातून ते भाजपातर्फे ते निवडून गेले होते. मोदी यांच्या दुसर्या सरकारमध्ये ते रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम करत होते. अंगडी यांच्या निधनामुळे मान्यवरांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.


