चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील श्रीसमर्थ विद्या मंदिरात वार्षिक सांस्कृतीक कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास विकासोचे माजी चेअरमन विठ्ठलतात्या महाजन उपस्थित होते. यावेळी जयपाल हिरे यांनी मुलांच्या कलागुणांचे कौतूक केले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतूक करून भविष्यात ही शाळा चांगल्या प्रकारे नावारूप येईल, असा विश्वास त्यानी व्यक्त केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश सोनवणे यांनी प्रमुख पाहुणे स्वागत केले व शाळेच्या प्रगतिचा अहवाल सादर केला.
शहीद जवांना दिली श्रध्दांजली
शाळेची शिस्त, मुलानी सादर केलेले कार्यक्रम शहरी मुलाना लाजवेल असे एकापेक्षा एक सुरेख, सुंदर व नाविण्यपूर्ण गाण्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शहीद जवानांना आंदरांजली वाहून देशभक्ती गीताने समारोप करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता देशमुख, छाया चौधरी, पूनम कुभांरे, सुजाता कुमावत, भैरवी महाजन, वर्षा साबळे, रूपाली चव्हाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास ग्रा.पं.मेहूणबारे उपसंरपंच ऋषिकेश अम्रृतकार, भा.ज.पा.किसान मोर्चा तालुकाध्यक्ष भैयासाहेब वाघ, अशोक गढरी, रामसिंग पवार वरखेडे, आनंदा भवर रहीपूरी, आबासाहेब निकम धामणगाव, सोमनाथ देवकर पळासरे याच्यासह भवूर, जामदा, रहिपूरी, पळासरे, वरखेडे, तिरपोळे, दसेगाव, मेहूणसबारे येथील पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन भैरवी महाजन, सुजाता कुमावत यानी केले तर आभार संगिता देशमुख यांनी व्यक्त केले.